सुरळीत विद्युत पुरवठा यासाठी वीज बिले भरण्याचे महावितरणचे आवाहन
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील संबंधित शेतकऱ्यांसह विद्युत मोटार धारकांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याकडील थकीत बिले तात्काळ भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी नागेश लोणे व सहाय्यक अभियंता पवनकुमार भडंगे यांनी केले आहे तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या ईस्लापुर हिमायतनगर हिमायतनगर ग्रामीण सरसम अशा एकूण चार शाखा आहेत त्या गावा अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या कृषी शेती पंपाच्या थकीत बिल आणि घरगुती व व्यावसायिक ग्राहकांनी थकीत आणि चालू वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे ज्या ग्राहकांना विज बिल या संदर्भात काही शंका असतील तर त्यांनी संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क करावा असे सांगण्यात आले भोकर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मोहनराव गोपुलवाड यांच्या आदेशानुसार हिमायतनगर चे उपकार्यकारी अभियंता नागेश लोंणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहर विभागाचे कनिष्ठ अभियंता पवन कुमार भडंगे यांनी सर्व शेतकरी व विद्युत मीटर धारकाला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज बिले भरून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र थकित बिले भरली नसल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याची वेळ आता महावितरण कंपनीवर आली आहे सहाय्यक अभियंता यांच्या सूचनेवरून सर्व लाईनमन जनमित्र विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कामास लागले असल्याचे पवन कुमार भडंगे यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे