हिमायतनगर येथील तहसिलदारांची मनमानी माजी आमदार नागेश पाटील यांनी केली उघड..
विज पडून मृत्यू झालेल्या नातेवाईकांना चेक देण्यास तहसिलदार करत होते विलंब शिवसेना स्टाईलने घेतली तहसीलदारांची झडती.
हिमायतनगर | कृष्णा राठोड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी येथील नागरिक विठ्ठल वाघमारे यांच्या वर वीज पडून त्यांचा मृत्यु झाल्याची घटना मागील काही दिवसा पूर्वी घडली होती त्या घटनेचा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्या मयताच्या नातेवाईकांना महणजे रखमाबाई विठ्ठल वाघमारे यांना अक्षरी चार लाख रुपयांचा चेक मिळून देण्यासाठी प्रयत्न केले पण हिमायतनगर चे तहसिलदार गायकवाड यांनी मागील दोन महिन्यापासून पीडितांच्या नातेवाईकांना वरवार तहसीलच्या चकरा मारायला लावत होते ह्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी आमदारास सुद्धा विद्यमान तहसिलदार यांनी अगोदर चेक तयार नाही,कर्मचारी सुट्टी वर आहेत,दोन दिवस लागतील असे उडवा उडविचे उत्तर दिले नंतर सबंधित माजी आमदार नागेश पाटील यांनी शिवसेना स्टाईल ने सबंधित आमदाराची पोल खोल केली तेव्हा तहसिलदार यांच्या टेबल मध्येच सबंधित पीडितांच्या नातेवाईकांचे नावे तयार असलेला चेक आढळून आल्याने उपस्थित माजी आमदार नागेश पाटील यांनी मां.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना फोन वरून संपर्क केला असता साहेब plz असे करू नका मी चेक देतो असे महनत विद्यमान तहसिलदार यांची तोतरी वळली व नंतर विद्यमान नायब तहसीलदार यांनी माजी आमदार नागेश पाटील व उपस्थितांची माफी मागितली व नंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या समोर मयताच्या नातेवाईकांना महणजे रखमाबाई विठ्ठल वाघमारे यांना चार लाख रुपयाचा चेक दिला
हिमायतनगर येथील तहसिलदार यांचा मनमानी पना सर्व जनतेसमोर माजी आमदार यांनी केला उघड ,सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या बाबी ची तात्काळ दखल घेऊन सबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांमधून होत आहे