राजकारण

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण सोडत जाहीर आज झाले जाहीर 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

आगामी काळात होणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथील तहसील कार्यालय येथे नव्याने सोडत काढण्यात आली आहे या आरक्षण सोडतीत शहरातील काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे तर काहींना नवीन संधी उपलब्ध झाली आहे तर काही वार्डाचे आरक्षण जैसे थे राहिल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पहायला मिळाले या सुधारित आरक्षण सोडतीची बैठक हिमायतनगर तहसील कार्यालय येथील सभागृहात दिनांक 15/11/2021 रोजी सकाळी अकरा वाजता हदगाव येथील उपविभागीय अधिकारी बिर्जेष पाटील ,यांच्या अध्यक्षतेखाली तथा तहसिलदार गायकवाड साहेब व नगर पंचायत चे रत्नाकर डावरे साहेब यांच्या उपस्थिती ही बैठक संपन्न झाली

 

या झालेल्या नव्याने आरक्षण सोडतीमध्ये वार्ड क्रमांक 1 ओबीसी सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 2 सर्वसाधारण महिला ,वार्ड क्रमांक तीन ओ.बी.सी. महिला ,वार्ड क्रमांक चार ओपन महिला, वार्ड क्रमांक पाच ओपन, वार्ड क्रमांक सहा एस.सी. महिला, वार्ड क्रमांक सात ओपन महिला, वार्ड क्रमांक आठ ओपन ,वार्ड क्रमांक 9 ओपन महिला, वार्ड क्रमांक 10 सर्वसाधारण महिला ,वार्ड क्रमांक 11 ओपन, वार्ड क्रमांक 12 ओबीसी महिलेसाठी राखीव ,वार्ड क्रमांक 13 ओपन, वार्ड क्रमांक 14 ओपन ,वार्ड क्रमांक पंधरा ओपन, वार्ड क्रमांक 16 ओ बी सी सर्वसाधारण , व वार्ड क्रमांक 17 एस.टी. महिलेसाठी राखीव असल्याचे निवडणूक अधिकारीयांनी सांगितले

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड ,अब्दुल अखिल, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हा. अ. गणी ,तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर खान ,सदाशिव सातव,भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष आशिष सकवान,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फेरो ज खूरेशी ,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष उदय देशपांडे ,गजानन चायल, मोहंमद जुनेद,जफर लाला, सालीम शेवाळ कर,राम नर वाडे,सावन डाके, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, पापा पार्डिकर,सूरज दासेवार,सुभाष शिंदे,हनीफ सर, स हिमायतनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब, व नगर पंचायतचे सर्व कर्मचारी व अधिकारी पत्रकार,ज्येष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *