नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर ते तीस केवी सब स्टेशन अंतर्गत गेल्या आठ दिवसा खाली डोलारी फिडर वर काम करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पोल वरून खाली कोसळल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी हिमायतनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते
पुढील उपचारासाठी नांदेड येथील गुरुगोविंद सिंग जी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे जे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्याठिकाणी उपचार चालू असताना आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार असून ते पळसपुर हेडकॉटर च्या लाईन मॅन चे चिरंजीव होते वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांच्या निधनाने पळसपुर डोलारी सिरपल्ली शेलोडा या गावावर दुखाचे सावट पसरले आहे