यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांना अदिब खान अखिलखान यांनी दिले निवेद
जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी च्या रिक्त जागा असलेल्या जागा याकरिता निवेदन द्वारे भेट देऊन आरोग्य मागण्या केल्या
ब्युरो रिपोटर एस.के. शब्बीर महागाव….
महागाव तालुका अंतर्गत शाखा फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पद असलेल्या जागा देण्यात यावे याकरिता
आरोग्य अधिकारी रिक्त पदे असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य यवतमाळ व तालुका आरोग्य अधिकारी महागाव यांच्याकडे तक्रार फुलसावंगी च्या गावकऱ्यांनी केली असून
आतापर्यंत कोणतेही पाहूल उचलले नाही यापूर्वी दोन आरोग्य अधिकारी दिले होते ते अधिकारी कामचुकारपणा आरोग्य केंद्रामध्ये सतत गैर हजर असल्यामुळे गावकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला म्हणून गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्यात दोन आरोग्य अधिकाऱ्याची बदली झाली असून फुलसावंगी हे गाव महागाव तालुक्यात फुलसावंगी उप कृषी उत्पन्न बाजार समिती असून या गावाला 30 ते 40 तांडा वस्ती व आदिवासी गावे सभोवताली लहान-मोठे याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे या आरोग्य केंद्राचा दररोजचा( ओ.पी.डी.) लोकसंख्या जवळपास 300 पेक्षा जास्त असल्यामुळे आर यम ओ… ला अतिरिक्त ताण पडत आहे याकरिता मा. मंत्री महोदयांनी वरील योग्य ती दखल घेऊन ताबडतोब आरोग्य केंद्राला रिक्त असलेल्या जागा देऊन या फुलसावंगी प्रार्थमिक आरोग्याच्या केंद्राच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी अदिब खान अकील खान गावकऱ्यांच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेश जी टोपे निवेदन पत्राद्वारे दिले