हिमायतनगर प्रतिनिधी/
आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्रजी फडवणीस व मा.श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेवरून व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री योगेश आण्णा टिळेकर यांनी दिलेल्या आव्हानावरुन ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्षित केल्यामुळे गेले आहे. यासाठी महाराष्ट्रात ओबीसी बांधवांना ओबीसी आरक्षणाबाबत सत्यता कळावी व जागृती व्हावी म्हणून जागर रथयात्रा काढली आहे. आता राजकीय आरक्षण गेले या पुढे शैक्षणिक व नोकरीतले आरक्षण जाऊ शकते. यासाठी प्रत्येक भागात ओबीसी जागर अभियान रथयात्रा फिरवण्यात येत आहे.
मा. नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रवीण साले यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये सुरुवात करण्यात आली यावेळी रथ यात्रा हिमायतनगर (वाढोणा) येथे आली असता भाजपा युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी. शहर अध्यक्ष खंडु सर .युवा मोर्चा शहर अध्यक्ष राम जाधव. भाजपा तालुका सरचिटणीस वामनराव मिरासे सुभाष माने ओबीसी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर शेवाळे.युवा सरचिटणीस परमेश्वर सुर्यवंशी.भाजपा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विनोद भाऊ सोनारीकर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त यावेळी उपस्थित होते