प्रतिनिधी/
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे आजादी का अमृत महोत्सव विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती कार्यक्रम दिनांक-09/11/2021 रोजी दिघी गावचे वकील अमोल वाघ व गंगाधर सावते यांच्या पुढाकाराने मौजे येथे आजादी का महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंडालिया साहेब यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व गावकऱ्यांच्या वतीने न्यायाधीश चंडालिया साहेब यांचा सत्कार करण्यात आला. कायद्याविषयी माहिती एडवोकेट अतुल वानखेडे एडवोकेट जाधव साहेब, यांनी दिले कायद्याचे पालन करावे कायदा सर्वांसाठी आहे कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सांगण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाघ व गंगाधर सावते यांनी केले आभार प्रदर्शन शेवटी गावचे पोलीस पाटील विलासराव कदम यांनी मानले