हिमायतनगर | कृष्णा राठोड
तालुक्यातील मौजे पोटा बु येथील माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मणराव पुल्लेवार व येथील कट्टर शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी आज दि.7 नोव्हेंबर रोजी ग्रामभूषण गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी असे सांगितले की खरंच शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात अगणित कार्य करणाऱ्या मान्यवरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे पण एका शिवसैनिकांने आयोजित केलेला ग्रामभूषण गौरव सोहळा खरच खूप कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळात मी गावच्या शैक्षणिक विकासासाठी लागेल तेवढी मदत करेल व आपले माजी आमदार व उद्याचे भावी आमदार नागेश दादा हे सुद्धा वेळोवेळी आपल्याला मदत करतीलच असे सुद्धा त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले व उपस्थित हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व ग्राम भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.
हिमायतनगर तालुक्यासह पंचक्रोशीत नाव लौकिक असलेल्या पोटा बु येथे शैक्षणिक ,वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांमध्ये अगणित यश मिळवून यश संपादन करणाऱ्यांचा गौरव सोहळ्या प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, भगवानराव पाटील पाथरडकर, रमेश भाऊ घंटलवार ,डॉक्टर संजय पवार, परमेश्वरराव पांचाळ, प्रभाकरराव देशमुख ,रामभाऊ ठाकरे, देसाईराव देशमुख कांडलीकर ,विशाल राठोड, अजय सूर्यवंशी, वाशी च्या सरपंच राठोड बाई,पत्रकार शितल ताई भांगे, श्रीमती लक्ष्मीबाई बापूराव जाधव सह आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्राम भूषण प्राप्त जवळ जवळ 50 जणांचा भव्य सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की मी नेहमी तुमच्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर आहे व आता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असल्याने येणाऱ्या काळात सुद्धा मी तुमच्या गावाला निधी कमी पडू देणार नाही जमेल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न अरेल असे उपस्थितांना बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक मौजे पोटा बु येथील माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मणराव पुल्लेवार व येथील कट्टर शिवसैनिक संतोष पुल्लेवार ,गजानन सूर्यवंशी,राम गुंडेकर,सह शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड,शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे,शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार,राम नरवाडे, संटी कप्पलवाड ,गावचे ग्राम भूषण देशमुख सर,माने सर,सूर्यवंशी सर,कैलास माने, सह गावकरी मंडळी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.