हिमायतनगर तालुक्यातील सिरंजीनी येतील श्रमदान करुन नवयुवक तरुणांनी गांव केले स्वच्छ
हिमायतनगर| कृष्णा राठोड
दिनांक- 01 नोंहेबर 2021 हिमायतनगर मधील सिरंजनी हे गाव पैनगंगेच्या तीरावर बसलेले एक टुमदार गाव.. गावातील शेती काहीशी समृद्ध.. अनेक वर्षांपासून ज्या गावाचे नाव लाल अक्षरात अधोरेखित केले जायचे ते म्हणजे सिरंजनी.
पण आता ते चित्र बदलले
वर्षा मागून वर्षे गेली.. गावातील तरुण वर्ग बर्यापैकी शिकला सवरला . तसेच येथील सत्तेचे समीकरणे बदलली.. नवनिर्वाचित सरपंच म्हणुन येथील उच्चशिक्षित तरुण व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे पवन करेवाड यांच्या सौभाग्यवती सौ. मेघा पवन करेवाड यांची निवड झाली.. सर्वात आधी गावात समृद्धी आहे ,परंतु आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल, असे पवन .करेवाड सरपंचानी सांगितले. व गावात आरोग्य राखायचे असेल तर गाव स्वच्छ झाला पाहिजे.!..
ठरले, तर मग हा विषय त्यांनी तरुणांपुढे बोलून दाखवला मग काय? तरुण मंडळींनी लगेच ओ दिला..
दिवस ठरला.. आठवड्यातील प्रत्येक रविवारी 2 तास सर्वानी श्रमदान करायचे व आपला गाव आपणच स्वच्छ करायचा..
दुसर्या दिवशी सकाळी रविवार .
सर्व तरुण ग्रामपंचायत च्या प्रांगणात हजर झाले.. फावडे आले.. कुदळ आले.. कुणी जंतूनाशक फवारणीसाठी पंप आणले… तर कुणी कचरा बाहेर फेकण्यासाठी ट्रॅक्टर ला बोलावले ..
सर्वांच्या चेहर्यावर आनंद होता.. उत्साह होता.
सर्व स्वच्छतेचे पुजारी! सर्व छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. महाराजांच्या नावाचा जयघोष केला.
नंतर स्वच्छतेचे मह्त्व सांगणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली.
शिवाजी चौक ते श्रीकृष्ण चौक असा सर्व परिसर स्वच्छ केला. नाली साफ सफाई केली. पहिला दिवस यशस्वी पार पडला.
ठरल्या प्रमाणे दर आठवड्याला तरुण जमून गाव स्वच्छ करू लागले.
ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली.
सोशल मीडिया मुळे राज्यातील अनेक भागात राहणारे गावाचे तरुण सरपंचांना फोन करून कौतुक करू लागले.. आपणही या कार्यात सहभागी व्हावे म्हणुन पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपुर, नांदेड वरुन येऊन एक दिवस गावासाठी वेळ काढणारे युवक यात सहभागी झाले. हम भी कुछ कम नही*प्रमाणे महिला व युवती सुद्धा या अभियानाचे घटक झालेत.
अश्या प्रकारे गावात नवचैतन्य निर्माण झाले.
आता एक दिवस अगोदर पूर्ण नियोजन करून प्रत्येक आठवड्यात दुसर्या दिवशी श्रमदान केले जाते
अजुनही हे कार्य असेच चालू राहील व डॉ. कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे देशासाठी वेळ काढणारा तरुण आज सिरंजनी मध्ये गवसला असे पवन करेवाड नेहमीच बोलून दाखवतात…