हात मदतीचा म्हणून महागांव तहसील चे कर्मचारी सरसावले पुढे
ब्युरो रिपोर्ट एस.के.शब्बीर
महागाव तालुक्यात गुंज साझ्यातील सारखन्ही गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी वडील.. शिवाजी डाखोरे सन 2018.साली आत्महत्या करून मरण पावले मजूर दार असल्याने शासकीय कोणतीही मदत किंवा लाभ भेटले नसून आई गिरजाबाई शिवाजी डाखोरे यातील चिमुकल्या लेकरांना घेऊन माहेरी आली आपली तीन वर्ष काढली
तीन वर्षे आपल्या माहेरी काढताना कोणत्याही भावांनी सात न देता गिरजाबाई शिवाजी डाखोरे आपल्या सासरी
परत जाऊन आपले ऊद्र पोषण करीत होती सन 2021 ला संजय गांधी निराधार योजनेची आवश्यक कागदपत्रे तयार करून दिनांक 9/9/ 2021.. ला तहसील महागाव येथे कागदपत्रे सादर केली आणि अवघ्या 20 दिवसानंतर आई गिरजाबाई किरकोळ बीमार पडून 29 /9/ 2021 ला तो मरण पावली त्यांच्या परिवारात तीन बालक हरिदास वय दहा वर्ष.. कोमल वय आठ वर्ष.. कुणाल वय सहा वर्ष.. या बालकांचे भविष्य अंधकारमय झाल्यागत दुःखात महागाव तहसील चे कर्मचारी महागाव तालुका अंतर्गत सारखणी येथे एक हात मदतीचा म्हणून तहसील कर्मचारी तलाठी कार्यकर्त्यांनी या बालकांच्या घरी जाऊन दीपावलीचे अंगवस्त्र कपडे स्वरूपी भेट दिले.. खरोखर कहानी इथे एका गरीब संसाराची दिसून आली