कोविड लसीकरण घ्या अन्यथा कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ – तहसीलदार डी.एन. गायकवा
हिमायतनगर – कृष्णा राठोड
शहरासह ग्रामीण भागात कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे ज्या नागरिकांनी covid-19 ची मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी अन्यथा त्यांना विवीध कामांसाठी लागणारे शासकीय प्रमाणपत्र व वेगवेगळ्या सरकारू योजनेच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागेल, कठोर नियम स्वत:ली लागु होण्यापुर्वी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार डी एन गायकवाड यांनी केले आहे.
कोविड १९ आजारातील पहिल्या, दुसऱ्या लाटेत अनेकांना आई , वडील, बहिण, भाऊ, जिव्हाळ्याचे नातेवाईक गमवावे लागले याची जानीव सर्वांनी ठेवली पाहिजे, कोरोनाचा अवघड काळ आपण पाहिला. अस भावनीक आवाहन तहसिलदार गायकवाड यांनी केल आहे. पुढे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,
कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी शासना कडुन मोफत कोविड लसीकरण मोहिम सुरू आहे, नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेवुन सुरक्षीत रहावे, कोरोना लसीकरणामुळे कोरोना होतो असे नाही, तर कोरोना झाल्यास त्या पासुनचा धोका कमी असतो.
नागरीकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावुन आजच लसीकरण करून घ्यावे, अन्यथा त्यांना विविध शासकीय प्रमाणपत्र, वेगवेगळ्या योजनेच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागेल, जाचक निर्णय कुणाला लागु करावा, अशी इच्छा नसुनही, जनतेच्या प्रकृती स्वासथ्यासाठी निर्णय घ्यावा लागत आहे, नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करत कोविड लसीचा लाभ घ्यावा.