बंद केलेली नांदेड आदिलाबाद सकाळची रेल्वे पूर्ववत सुरु करा राजू पाटील
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे
कोरूना काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता हळूहळू सर्वच रेल्वे गाड्या सुरू होत असल्याचे दिसत आहे
तिसऱ्या टप्प्यातील कोरूना ने अद्याप पर्यंत फारसे परिणाम दाखविले नाही त्यामुळे हळूहळू सर्व रेल्वे सुरू होत असल्या तरी नांदेड येथे जाण्यासाठी आदिलाबाद परळी ही सकाळची रेल्वे अद्याप सुरू करण्यात आली नाही त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दिवाळीचा सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे तरी ही रेल्वे गाडी तात्काळ सुरू करावी अशी मागणी माजी सरपंच राजू पाटील भोयर सेल्लोड कर यांनी केली आहे