राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप

खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

हिंगोली : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या सामाजिक अधिकारिता ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व वरिष्ठ नागरीक तपासणी शिबीर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील ४ हजारच्या वर दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये एकूण ३०३० लाभार्थी साहित्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये वसमत तालुक्यातून ६७०, हिंगोली तालुक्यातून ९०० , सेनगाव मधून ४५० तर कळमनुरी मधून ७२० आणि औंढा नागनाथ तालुक्यातून २९० लाभार्थी आहेत . यामध्ये तपासणी होऊन गरजू दिव्यांग बांधवाना साहित्याचे वाटप केले जाणार होते. परंतु कोरोनामुळे साहित्य वाटप कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून पहिल्या टप्यात वसमत ,हिंगोली आणि सेनगाव येथे निःशुल्क साहित्याचे वाटप केले जाणार आहे तर दुसऱ्या टप्यात कळमनुरी आणि औंढा येथील साहित्याचे वाटप करण्यात येईल .साहित्य वाटप शिबिरास लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .

हिंगोली जिल्ह्यात पहिल्या टप्यात हिंगोली , वसमत आणि सेनगाव येथे साहित्य वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे . यामध्ये २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वसमत येथे पंचायत समितीच्या मैदानावर लाभार्थ्यांना साहित्य दिले जाईल . हिंगोली येथे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कल्याण मंडपम येथे साहित्याचे वाटप होईल, तर सेनगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पंचायत समिती मैदानावर खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप केले जाईल. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून व केंद्र सरकारच्या एलिम्को च्या विशेष उपक्रमाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात सामाजिक अधिकारिता शिबिर ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग बांधव व वरिष्ठ नागरीक यांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा अनुभवल्या होत्या दिव्यांग बांधवांची एकंदरीत परिस्थिती पाहून खासदार हेमंत पाटील अत्यंत भावुक झाले होते . त्यावेळी ते म्हणाले कि, दिव्यांगासाठी करत असलेले काम हे कागदोपत्री न करता आपली सामाजिक जबाबदारी आणि त्यांच्याप्रति प्रेम, जिव्हाळा व आपुलकीची भावना ठेवून केल्यास तीच खरी ईश्वर सेवा असेल त्यांना समाजाच्या इतर घटकाप्रमाणे स्थान देऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघातील एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.रंजल्या गांजल्यांची आणि दीनदुबळ्यांची सेवा केल्यानेच खऱ्या अर्थाने जगण्याचे सार्थक होते .

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील १५ हजार दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १० हजार दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्यात आवश्यक साहित्याच्या वाटपाला माहूर येथून सुरवात करण्यात आली होती. राज्यामध्ये हा अभिनव उपक्रम सर्वप्रथम हिंगोली लोकसभा मतदार संघाने खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला होता . हिंगोली सोबतच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सुद्धा याचा लाभ होणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु यंत्रणेच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहचत नाही हि खेदाची बाब आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सायकल , हिअरिंग एड, कॅलिपर, ब्रेल किट, आदी साहित्याचे वाटप या साहित्य वाटप शिबिरात करण्यात येणार आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *