हिमायतनगर तालुक्यातील रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच ईडीकडे करणार- पत्रकार दाऊ गाडगेवाड,
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्याचे काम चालू असताना खासदार,आमदार यांना मात्र मौन बाळगणेच योग्य वाटत आहे, याचा अर्थ असा होतो कि तालुक्यात रस्त्यामध्ये जो काही कंत्राटदार भ्रष्टाचार करत आहेत त्याला यांचा पाठींबा असल्याचेच जाणवते. कारण खासदार,आमदार यांना जनतेनी जनतेच्या विकास कामांसाठी निवडून दिलेले असते परंतु आज घडीला विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचारचं जास्त केला जातो. उदाहरणचं द्यायचे झाले तर डोल्हारी पासून काही अंतरावर पैनगंगा नदीवर गांजेगाव येथे बंधारा आहे. आणि याच बंधाऱ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ जोडल्या गेला आहे. डोल्हारी पासून पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८०० मीटर पर्यंत मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात आले आहे. या ८०० मिटरमध्ये दोन कंत्राटदार आहेत. आणि या दोन्ही कंत्राटदारांनी या ८०० मिटर रस्त्याच्या डांबरीकरणाची विल्हेवाट लावून टाकली .
रस्ता बघीतला तर रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पहायला मिळेल.
अशीच काहीशी परीस्थिती वारंगटाकळी ते मंगरूळ रस्त्याची आहे. परत खडकी बाजार ते घारापूर रस्त्याची अवस्था तीच आहे, वाळकेवाडी ते आश्रम शाळेकडे जाणारा निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता असे उदाहरण द्यायला गेलं तर यादी फार मोठी होईल. आणि ह्या रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार सर्व आमदार साहेबांच्या जवळील ( मर्जीतील) व्यक्ती आहेत. त्यामुळे आमदार, खसदार तर यांच्यावर काहीच करवाई करणार नाहीत. तहसिलदार, जिल्हाधिकारीही या विषयावर काहीच बोलत नाहीत. रस्त्याचे काम पाहणारे अभियंतेही तसेच म्हणजे यांची एक साखळीच तयार झाली आहे. आता या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराला वाचा फोडायची असेल तर एक मात्र पर्याय उरला तो म्हणजे ईडी. ईडीकडे तक्रार केल्याशिवाया हा भ्रष्टाचार उघडकीस येणार नाही . हिमायतनगर. तालुक्यातील ज्या काही रस्त्यांचे डांबरीकरण निकष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर हिमायतनगर नगरपंचायतीने शहरात जे काही विकासकामे केली आहेत. त्या सर्व कामांची चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक चौकशी करून कारवाई करण्यात यावी . मग ते रस्ते खासदार, आमदार, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, जिल्हा परीषद कोणत्याही कोट्यातून झालेले असतील. त्या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी. यासाठी मी लवकरच ईडीकडे हिमायतनगर तालुक्यातील रस्त्याच्या भ्रष्टाचाराची तक्रार ईडीकडे करणार आहे असे पत्रकार दाऊ गाडगेवाड यांनी सांगितले आहे.