राब राब राबले मुलासारखे फुलवले अतिवृष्टीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे स्वप्न तसेच राहीले,
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा जोमाने शेतामध्ये राबताना दिसत होते. नगद पीक आलेला सोयाबीन काढणे चालू होती. व कापूस पीक मोठ्या प्रमाणामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये घेतला जातो. कापूस वेचणी ला सुरुवात केली होती शेतकरी बांधवांनी. परंतु 16 ऑक्टोंबर रोजी ढग फुटी प्रकार व रात्रभर पाऊस पडल्याने. अनेक शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे अति मुसळधार पावसामुळे कापूस पीक जमिनीवर पडून व जाग्यावरच सडून जाताना दिसत आहे. सोयाबीन पिकाचे अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये सोयाबीनचे ढिग व कडपी पाण्यामध्ये भिजताना दिसले. परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झालेला आहे. सर्व शेतकरी वर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी कुटुंब या परतीच्या पावसामुळे रस्त्यावर येण्याची शक्यता आहेत. व नुकतेच शासनाने अतिवृष्टी जाहीर केली परंतु. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हेक्टरी दहा हजार प्रमाणे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली. परंतु नुकसान भरून निघू शकत नाही असे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनमधून बोलल्या जात आहे.