हिमायतनगर पळसपूर येतील राधाबाई वानखेडे यांचे निधन
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील वयोवृद्ध कलाकार महिला राधाबाई पुंजाराम वानखेडे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 15 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे
त्यांच्या पश्चात पती दोन मुलं एक मुलगी सुना नातू नाती असा मोठा परिवार असून राधाबाई वानखेडे आनंद सांप्रदायिक महिला भजनी मंडळाच्या सदस्या असून ते वयोवृद्ध कलाकार होत्या
सर्वसामान्यांच्या दुखासुखात धावून जाणाऱ्या अस्या एक महिला म्हणून त्यांची पळसपुर नगरीमध्ये ख्याती होती त्यांच्या निधनाने पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक 16 रोजी दुपारी एक वाजता पळसपुर येथे त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत