महागांव तालुका ठरला अवैध धंदे साठी नंबर 1 वर हरिभाऊ रामचंद्र खंदारे,
ब्युरो रिपोर्ट/ एस.के शब्बीर महागाव
1) मागील काही दिवसा अगोदर महागाव पोलिस स्टेशनचे( ए. पि. आय बालाजी शेंगफल्लू संतोष जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्या सह एकता मिळून महागाव तालुक्यात मुडाणा दगडथर उटी करंजखेड असे अनेक गावोगावी जाऊन रात्रीच्या वेळा सुद्धा यांनी धाड टाकण्यास एस पावले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दारूबंदीसाठी त्यांना आव्हान केले होते परंतु आज त्याच गाव गाव मध्ये जोराने मटका जुगार दारू गुटखा गांजा यासह अनेक अवैध धंदे मोठ्या जोराने दिसून येत आहे
2) महागाव पोलिस स्टेशनचे अवैध धंद्यासाठी दुर्लक्ष दिसून येत असल्यामुळे महागाव शहरा अंतर्गत दहा किलोमीटर अंतरावर गुंज येथे अवैध धंदे दिसून आले यामध्ये मटका जुगार गांजा विक्री गेल्या अनेक दिवसापासून होत असल्याने त्याच्या नादी लागून अनेकांची संसाराची राखरांगोळी होत असल्याने अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थचे
तीन तेरा वाजले असून नागरिकाच्या जीवाची हानी होत आहे त्यात लेकीबाळी च्या संसाराची वाट सुद्धा लागलेली दिसून येत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन महागाव तालुक्यात अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरिकाची आहे