…..चुकीची आकडेवारी देणार्यां अधिकारी यांना निलंबित करा
भाजपची मागणी
नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास पंधरा दिवसांपासून सतत वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झालेला पाऊस असताना देखील सोयाबीन कापूस हातचे गेले असुन ७० -८० टक्के शेतकऱ्यांना चपाठा बसला असताना देखील महसूल विभागाच्या चूकीच्या आकडेवारीनुसार शेतकरी अडचणीत येऊ शकतो अस्या चुकीची आकडेवारी देणार्यां अधिकारी यांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांनी केली आहे आज शेतकरी पावसामुळे आर्थिक संकटात सापडला असताना देखील महसुल प्रशासनाची व लोकप्रतिनिधी यांनी शेतकर्यांची चेष्टा केली जर का सुधारीत आकडेवारी जाहीर नाही केली तर येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी व महसुल अधिकारी यांना खेड्यात फिरणं मुसकिल केले जाईल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी राजकारणाच्या जागी राजकारण करा तूम्हच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा गळा घोटु नका असे आवाहन टिम मोदी स्पोर्टर संघ यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे एकीकडे आदेश द्याचा व दुसरीकडे काडुन घ्यायचा हे नाटक बंद करा सामान्य माणूस प्रत्येक संकटाला तोंड देवू शकत नाही त्याला त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन आवश्यक आहे ते साधन त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे तर तो आपल्या संसारात राहून काही तरी करु शकतो त्याचा अंत बघु नका एससी मध्ये राहुन आकडेवारी टाकु नका त्यांच्या बांधावर जा आपले अधिकारी काय करतात याकडे लक्ष केंद्रित करा आमदार हा जनतेचा प्रतिनिधी आहे त्यांनी आपल्या जनतेची सेवा केली पाहिजे मुंबई किंवा दिली मध्ये बसुन आकडेवारी जाहीर करण्यास सांगु नाही यांचा अभ्यास करुन आकडेवारी ठरवली पाहिजे असे वक्तव्य मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांनी यावेळी केले जर का आकडेवारी मध्ये सूधारना नाही व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ निलंबित नाही केले तर लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.