सरसम ते कोतलवाडी रस्त्याची दुर्देवी अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील सरसम ते कोतलवाडी रस्त्याला कोणी वाली नसल्याने दहा वर्षात रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वरील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने बांधकाम विभागाने या रस्त्यावर लक्ष देऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे
जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभाग गेल्या काही दिवसापूर्वी या रस्त्याचे सुधारणा करण्यासाठी0/300/900 एस आर पी एफ 216-17 मध्ये सरसम गावापासून एक किमी काम केले मात्र की दोन की मी रस्त्यावर आत्तापर्यंत मुरुमाचे टोपले सुद्धा टाकले नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी रहात असलेल्या नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो रात्री बे रात्री रुग्णांना सर सम ला रुग्णालय असल्याने येथील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत सरसम ते कोतलवाडी रस्त्याकडे लोक प्रतिनिधीनि सुद्धा लक्ष देऊन रस्त्याचे काम करण्याची मागणी जोर धरू लागले आहे