ईसापुर धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्याने पैनगंगा नदी ला महापुर.
हजारो हेक्टर वरील पीकाचे नुकसान ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या.सौ.अनुमाला वानखेडे
नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे
दि३०:-हिमायतनगर तालुक्यात आठ दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस व ईसापुर धरणातुन अतिरिक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने पैनगंगा नदीला महापुर आल्यामुळे नदीकाठावरील हजारो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे हिमायतनगर तालुक्यातुन वहाणार्या पैनगंगा नदी वरील बोरी पुल व गांजेगाव पुलावर पाणी आल्यामुळे हिमायतनगर -उमरखेड, हिमायतनगर-पळसपुरमार्ग ढाणकी वहातुक बंद झाल्याने जण जीवन विस्कळीत झाले.
अनेक वेळा गांजेगाव पुलाची उंची वाढवण्यासाठी मागणी करुन सुद्धा लोक प्रतीनिधी दुर्लक्ष करत आहेत.
सतत तीन वर्षांपासून अती वृष्टी होत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे यावर्षी मोठ्या कष्टाने सोयाबीन ला अकरा हजार रुपये भाव मीळेल या आशेन मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीकाची पेरणी केली परंतु आठ दहा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे व ईसापुर धरणातुन अतिरिक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगा नदीला हिमायतनगर तालुक्यात महापुर आल्यामुळे नदीकाठावरील हजारो हेक्टर जमीन वरील पीक नष्ट झाले त्यामुळे शेतकरी हवालदिक झाला आहे
तालुक्यातील कामारी,पींप्री,विरसणी, टेंभुर्णी,घारापुर, हिमायतनगर, रेणापूर, पळसपुर,लींगा,डोल्हारी बुदलि सीरपली,शेलोडा,कोठा,एकंबा,बोरगडी धानोरा टाकळी,मंगरुळ इत्यादी गावची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली
शासनाने या पुर पहानीची पहाणी करून अती वृष्टी झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले हे ईसापुर धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्याने पैनगंगा नदी ला महापुर.
हजारो हेक्टर वरील पीकाचे नुकसान
ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या.
अशी मागणी पळसपुर ग्रामपंचायती च्या सदस्या
सौ अनुमाला वानखेडे यांनी केली