हिमायतनगर प्रतिनिधी/
तालुक्यातील मौजे वाघी येथील अंदाजे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक विठ्ठल तोलबा वाघमारे यांच्या वर आज सकाळी अंदाजे 8 च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या अतिवृष्टित गावालगत असलेल्या शेत शिवारात त्यांच्या वर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली असल्याचे येथील ग्रामस्थ श्री राम माने पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की मागील आठ दिवसांपासून तालुक्या सह जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक ह्या पाण्यामुळे गेले असल्याने त्यांच्या वर येणं दिवाळीच्या तोंडावर खुप मोठे संकट ओढावले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे आणि त्यातच हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तथा मजुरदार विठ्ठल तोलबा वाघमारे यांच्या वर आज सकाळी अंदाजे सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावा लगत असलेल्या शेत शिवारात वीज पडून जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची खळबळ जनक घटना घडली त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी असा मोठा परिवार आहे त्यामुळे शासनाने वाघमारे कुटुंबास आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या घटनेची नोद घेऊ. त्यांना आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी मौजे वाघी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे