राजकारण

पळसपुर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी वसंत पाटील वानखेडे 75 मते घेऊन दणदणीत विजय झाले

पळसपुर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी वसंत पाटील वानखेडे 75 मते घेऊन दणदणीत विजय झाले

नागोराव शिंदे यांची बातमी

हिमायतनगर दि.१५ :-पळसपुर ता हिमायतनगर येथील बिनविरोध पाच वर्षे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष असलेल्या वसंत चांदराव वानखेडे पाटील यांची सातव्या वर्षी अटीतटीच्या निवडणूकीत 75मते घेऊन विजय मिळवला

पळसपुर ता.हिमायनगर तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बहुमताने निवडून आले आहे

 

आज १५रोजी सकाळी तंटामुक्त समिती अध्यक्षा ची ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच मारोती वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली ग्रामसेवक साईनाथ कासटवार यांनी ग्रामस्थां समोर

निवड प्रक्रिया ठेली असताना

अध्यक्ष पदा साठी रिंगणात चार उमेदवार इछुक असल्याने

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली

तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी 1) अनंत कदम, 2) विनायकराव सुर्यवंशी, 3) मधुकर गायकवाड, 4) वसंत चांदराव वानखेडे पाटील यांची नावे आल्याने मतदान घेण्यात आले

या निवडणुकीत वसंत वानखेडे पाटील यांना सर्वात जास्त मते घेऊन विजयी झाले

वसंत पाटील यांना मिळालेले मते (७५),विनायकराव सुर्यवंशी (५२), अनंत कदम (२६), मधुकर गायकवाड (५)मते मिळाली

एक जणानी नोटा चा वापर केला. असुन एकुण 1५९ मतदान घेण्यात आले होते

निवडणूक निर्वाचीन अधीकारी म्हणून ग्रामसेवक साईनाथ कासटवार यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी वसंतराव पाटील वानखेडे यांची तर समिती मध्ये जेष्ठ नागरिक म्हणून देवराव वानखेडे बाबुराव माळकरी पत्रकार प्रतिनिधी म्हणून विष्णु जाधव , संतोष वानखेडे यांची निवड झाल्याचे घोषित केले

यावेळी प्रामुख्याने उपस्थित गावचे पोलीस पाटील शंकर विठ्ठल राव वानखेडे सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन तुकाराम देवसरकर, डॉ प्रकाश वानखेडे, आनंदराव देवसरकर,किशनराव वानखेडे, माजी सभापती वामनराव वानखेडे माजी उपसरपंच सुनील पंतगे माधवराव देवसरकर रामराव शाहिर सदाशिव वानखेडे जेगदेराव बोंबिलवार शेषराव वाघेकर नागोराव वाघमारे बबन वाडेकर पुंजाराम वाडेकर सतिष वाडेकर पत्रकार नागोराव शिंदे ,दाऊ गाडगेवाड , विष्णू जाधव,बाबुराव माळकरी, बालाजी चिंताकुंटे अविनाश वानखेडे,बबन वाडेकर दिगांबर वानखेडे (शालेय शिक्षण समीती अध्यक्ष) रावसाहेब वानखेडे यांच्या सह गावातील बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *