ताज्या घडामोडी

नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी,

 नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी,

 

नांदेड /एस. के. चांद यांची रिपोट

नायगाव तालुक्यात व नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यास हेक्टरी 80 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या.

भारतीय मराठा महासंघच्या वतीने नायगाव तहशिलदार साहेबांना देण्यात आले

गेल्या आठवड्यापासून नायगाव तालुक्यासह व नांदेड जिल्हात पाऊसाने थैमान घातले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या लहरी पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे व दि सहा व सात तारखीच्या मध्यरात्री मोठा पाऊस झाल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यास हेक्टरी 80 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या अशी मागणी चंद्रकांत पाटिल पवार होटाळकर भारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीत सोयाबीन कापुस तुर व ज्वारी इतर अनेक पिके या पावसामुळे उडिद सोयाबीन भिजुन त्याला कोंब फुटत आहेत अशातच अनेक शेतकऱ्यांचे उडीद कापुन गोळा करून ढिग ठेवले होते त्याच्या खालुन पाऊसाचे पाणी जाऊन त्यांचे पण मोठं नुकसान झाले आहे.सतत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे विमा उतरवित आहे जेणेकरून अशा लहरी संकटामुळे त्यांना पिक विमा मिळुन मदत होईल या आशेने विमा भरत आहेत परंतु पिक विम्याच्या जाचक‌ अटीमुळे तीन ते चार वर्षांपासून नुकसान होऊन देखील शेतकरयांना विमा मिळत नसुन या विषयावर कोणतेहि खासदार व आमदार आवाज उठवायला तयार नाही.त्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विमा मिळेल अशी शेतकरी आशा पोटी जगत आहेत महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब, यांनी पिकविमा कंपनीला आगाऊ 25%रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची सुचनाही केली परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे खुपचं जास्त नुकसान असल्यामुळे त्यांना भरीव पिक विमा मिळवून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे हि पण मागणी केली आहे.अनेक गावातील नदी नाले या अतिवृष्टीच्या पाऊसामुळे भरुन वाहत असुन नदी नाले काठच्या जमिनीत पाणी घुसून जमिनी खरडुन‌ वाहुन गेली आहे अशा अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने शेतकरयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदत केली पाहिजे अशीही मागणी चे पत्र माननीय तहसीलदार कार्यालय नायगाव यांना देण्यात आले व पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब व नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब विपिन विटणकर यांना पत्र देऊन सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चे पत्र नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर नायगाव तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील जाधव नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील सातेगाव कर माणिक पाटील चव्हाण साई पाटील मोरे प्रताप पाटील सोमठाणे कर धम्मदीप भद्रे देवीदास पाटील वडजे बालाजी पाटील धनज कर समर्थ पाटील शिंपाळे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *