राजकारण

खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.

खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सनियंत्रण समितीची बैठक संपन्न..दिशा समिती, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची

नांदेड हिंगोली/ नागोराव शिंदे 

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये खा. हेमंत पाटील, व आ. संतोष बांगर यांचा इशारा….

सणासुदीच्या काळात सामान्य जनतेची वीज तोडली तर गाठ माझ्याशी आहे.

आमदार संतोष बांगर यांनी दिला महावितरण च्या अधिकाऱ्यांना इशारा….आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक 

खा. हेमंत भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर

यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा व एकही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्या असा इशारा खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर साहेब यांनी दिशा समितीच्या बैठकीत दिला.   यावेळी खा. हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर साहेब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, संसद आदर्श ग्राम योजना प्रधानमंत्री आवास योजना या सह इतर योजनांचा आढावा घेतला.यावेळी खा. हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर साहेब यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र हे पंचनामे वस्तुनिष्ठ झाले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा झाला पाहिजे. एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मध्ये सांडस-सालेगाव, बेलमंडळ या पुलाचे बांधकाम मंजूर होऊन 6 महिने झाले तरी अद्यापही निविदा का काढण्यात आली नाही असा प्रश्‍न खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर साहेब यांनी उपस्थित केला. मात्र यावर संबंधित अधिकारी निरुत्तर झाले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या संथ कामावरून आ.संतोष बांगर साहेबांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम का सुरू केली असा खडा सवाल आ.संतोष बांगर साहेब यांनी उपस्थित केला.एकीकडे वीज कंपनीचे मोठे प्रकल्प मंजूर झाले असताना त्या कामाकडे दुर्लक्ष करून वीजग्राहकांना सण उत्सवाच्या काळात विनाकारण त्रास देऊ नका, ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याला वीज कंपनी जबाबदार राहील असा इशाराही आ.संतोष बांगर साहेबांनी यावेळी दिला. कळमनुरी तालुक्यातील दाती येथे उपकेंद्र मंजूर झाले. त्यासाठी जागा देखील उपलब्ध झाली. मात्र पुढे काय झाले या प्रश्नावर वीज कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विहिरींची कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचनाही खा.हेमंत भाऊ पाटील व आ.संतोष बांगर यांनी यावेळी दिल्या.शिवसेनेचे खा हेमंत भाऊ पाटील व हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी सामान्य जनतेशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर आक्रमक पणे आवाज उठवल्यामुळे प्रशासनातील अधिकार्‍यांना चांगलाच घाम फुटला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *