हिमायतनगर शहरात झालेल्या खुनातील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तीन आरोपी गजाआड –
हिमायतनगर प्रतिनिधी दि१२:-
शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरातील बस स्थानकात दि ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झालेल्या खुनातील आरोपी विरुद्ध गु. र. न.२१३ प्रमाणे कलम ३०२,३०७,३४ भा.द.वी.प्रमाणे उत्तम खंडेराव मिराशे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हिमायतनगर पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
व त्या तीन आरोपींना १५ सप्टेंबर पर्यंत म्हणजे चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी सांगितलेया बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात दि ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान मयत यश उत्तमराव मिराशे व आरोपी अनुज पवणेकर या दोन शाळकरी वर्ग मित्रा मध्ये बस स्टँड परिसरात भांडण झाले होते ते भांडण येवढे वाढले की त्यात यश मिराशे यांचा प्राण गेला तर सोहन चायल हे गंभीर जखमी झाला असल्याची थरारक घटना श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या सी. सी.टिव्ही मध्ये कैद झाली आहे त्या घटनेचा तपास हिमायतनगर पोलिसांनी लाऊन ह्या घटने मध्ये सहभागी असलेल्या ३ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या वर गु. र. न.२१३,प्रमाणे कलम ३०२,३०७,३४ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी असे सांगण्यात आले की ह्या दोन मित्रा मध्ये ग्रुप ची बदनामी का करतोस ! अफवा का पासरवतोस महणुंन आरोपी अनुज सुशांत पवनेकर वय १८यांनी त्यांच्या जवळील चाकू ने यश वर भर बस स्थानकात चाकूने हल्ला करून त्याचा प्राण घेतला व त्यांच्या सोबत असलेल्या सोहन ला गंभीर जखमी केले यावेळी त्यांच्या सोबत आरोपी अब्दुल सलीम अब्दुल जबार वय १८ सह करणं सिंग प्रकाश सिंग ठाकूर वय १७ वर्ष ५ महिने ह्या तिघांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी सांगितले आहे
या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदरशना खाली पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, पोलीस उप निरीक्षक परशुराम देवकते ,बिट जमादार हेमंत चोले, करत आहेत