हिमायतनगर :- ( नागोराव शिंदे.)
नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील मौ. गऊळ या गांवी जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांनी साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवून त्या गावातील मातंग समाजाच्या लोकांवर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हा प्रकार अतिशय चिड आणणारा असून या निंदनीय घटनेचा हिमायतनगर तालुक्यातील लहूजी शक्ती सेना तालूका शाखा व तसेच तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविला आहे. ता. 08 बुधवारी परमेश्वर मंदिर कमानी पासून तहसिल कार्यालयापर्यंत लहुजी शक्ती सेना व तसेच तालुक्यातील तमाम मातंग समाज बांधवांनी मोर्चा काढून ग ऊळ घटनेच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत तहसीलदार डि. एन. गायकवाड यांना निवेदन दिले आहे. गऊळ येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मान जनक पद्धतीने बसविण्यात यावा, व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, या प्रकरणात लाठीचार्ज करणारा डिवायसपी कांबळे याला सह आरोपी करून कार्यवाही करावी, व तसेच या प्रकरणात सामिल असलेल्या गांव गुंडावर जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अॅटरासिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येवून कायदेशीर कारवाई करून मातंग समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनात केली आहे.
या वेळी लहुजी शक्ती सेनेचे राजू गायकवाड, संतोष हातवेगळे, वंचित बहुजन आघाडीचे तालूका अध्यक्ष डॉ. रविराज दुधकावडे, जिल्हाउपाध्यक्ष गोविंदराव गोखले, दत्ता शिराणे, संतोष बनसोडे, गंगाधर गायकवाड, संतोष अंबेकर, अंकूश कांबळे, बालाजी शिराणे, मंगेश गाडगे, तानाजी गाडेकर, विकास गाडेकर, वनीता रामजी चितरवाड, दयानंद वाघमारे, दिपक गोरेकर, गजानन जांभळकर, गणपत गाडेकर, प्रदीप गोरेकर, मारोती गाडेकर, राजू गुंडेकर, प्रशांत तपासकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.