शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कडे केली मागणी,सिमा स्वामी लोहराळकर
हिमायतनगर प्रतिनिधी नागोराव शिंदे
दि.३:-देशात महाराष्ट्रात कोरोणा संसर्गजन्य आजार वाढल्याने गेल्या दिड वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात असल्याने शाळा सुरु करण्यासाठी सीमा स्वामी लोहराळकर भष्टाचार समीती नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
शाळा सुरु करण्यासंदर्भात अजून निर्णय नाही असे, राज्याचे शिक्षणमंत्री म्हणतात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे. म्हणून ‘शाळा’ सुरु करण्यात याव्यात
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. ही गंभीर बाब आहे. मा. शिक्षणमंत्री शाळा सुरु करण्यासंदर्भात अजून निर्णय घेत नाही त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना सांभाळणे, त्यांना ऑनलाईन शिक्षण देणे, त्यांचेवर लक्ष देणे अवघड जात आहे. त्यामुळे शाळा पूर्ववत करणे अत्यंत गरजेचे आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातील मुलं मुली ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. अशा कित्येक लोकांच्या तक्रारी समोर येत आहे. काही तक्रारी अशा आहेत की, हे ऑनलाईन शिक्षण डोक्याच्या वरून जात आहे. त्याचा काही उपयोग होत नाही. शिवाय ऑनलाईन शिक्षण सर्वाना ते शक्य पण नाही. यासाठी मागील वर्षभरात आंदोलन, उपोषण झाली आहे की, शाळा सुरु करा, परंतु सरकार याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. वर्षेभर इतर गोष्टी बंद जरी ठेवल्या तरी फारसे फरक पडणार नाही. परंतु शाळा बंद ठेवल्या तर मोठे देशाचे व विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा सुरु करा, आज कित्येक कुटुंबानी आपल्या मिळकती मधून आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण दिले, परंतु कोरोनामुळे घेतलेले सगळे शिक्षण पाण्यात गेले म्हणायचं वेळ आली आहे. किंबहुना सारं व्यर्थ गेले. परिणामी पालकांकडे तशी आता आर्थिक परीस्थिती नाही. या मध्ये श्रीमंत वगळले तर, हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे मुलं पूर्णपणे वाह्यात गेलेले दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत त्यांना घरी सांभाळणे पालकांना कठीण काम झाले आहे. ज्या ज्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कोरोना स्थिती कमी आहे, ओसरली आहे. तेथील शाळा आपल्या नियमाप्रमाणे त्वरित शाळा सुरु करावे. करिता आपणास निवेदनातून शाळा सुरु करण्याची मागणी संगीता झींजाडे,सुप्रीया डोणेकर, सीमा स्वामी लोहराळकर जिल्हाध्यक्ष, नांदेड जन आक्रोश भ्रष्टाचार समिती महाराष्ट्र राज्य यांनी नांदेड जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे