Naded /हिमायतनगर :/ ब्युरो रिपोट
शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी अपघात होत आहेत ह्या बाबींकडे नगर पंचायत प्रशासन आणि वाहतूक पोलीस लक्ष देत नाहीत त्यामुळे शहरवासीयांची समस्या आखणीच बिकट होत चालली आहे.
शहरातील जनावरांच्या गोठ्याचा प्रश्न मागील कित्येक दिवसा पासून एरणीवर आहे ह्या बाबी कडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार खासदार हे लक्ष का ? देत नाहीत असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत शहरातील विविध वस्त्यांमध्ये होत असलेल्या जनावरांच्या वावरा मुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सुद्धा मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघातसुद्धा झालेले आहेत.या बाबी कडे स्थानिक नगर पंचायत मात्र लक्ष देत नाही त्यामुळे मोकाट जनावरांमुळे शहरात वाहतुकीचा मोठा खोळंबा होऊन नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे शहराच्या सीमावर्ती भागात मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे एकीकडे कोंडवाड्याच्या नावाखाली तेथे अतिक्रमण करून राजकीय लोकांनी आपली पोळी भाजून घेतली जे शहरात मोकाट जनावरे बांधण्यासाठी शासनाने लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला होता तो पण कोंडवाडा कागदोपत्री दाखवून तो निधी हडप केल्याचे सध्या नागरिकांन मधून ऐकण्यात येत आहे तरी देखील स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत का ? बसले आहे याकडे खासदार , आमदारां सह इतर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा शहरात नागरीक करीत आहे.