ब्युरो रिपोट नांदेड / एस. के. चांद
बैठक व कार्यकर्ता संवाद मेळाव्यास सर्वजन उपस्थीत रहावे.शंकर महाजन जिल्हा उपाध्यंक्ष बिलोली- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड येथे आढावा बैठकीचे व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या रेखाताई ठाकूर यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पक्षबांधणीच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद व त्या – त्या जिल्ह्यातील पक्ष कार्याचा आढावा घेण्यासाठी विभाग वाईज कार्यकर्ता संवाद व अहवाल बैठका आयोजित करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात विदर्भ विभागाच्या सर्वच जिल्ह्यामध्ये ह्या बैठकांचे आयोजन करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला व पक्षबांधणी संदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्या जिल्ह्याचा एकूण कार्याचा अहवाल प्रदेश कार्यकारणीच्या वतीने घेण्यात आला. त्यानंतर नाशिक , धुळे, नंदुरबार अदी जिल्ह्यात या बैठका व कार्यकर्ता मेळावे संपन्न झाले.
याच अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा व अहवाल बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, महिला आघाडीच्याराज्य महासचिव अरुंधतीताई शिरसाट , राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, राज्य प्रवक्ता फारूक अहमद याचबरोबर मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे, विभागीय उपाध्यक्ष केशव मुद्देवाड, सदस्य डॉ. संघरत्न कुऱ्हे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नांदेड शहरातील हॉटेल विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे दोन सत्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या सत्रात शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन, सकाळी 11:00 वाजता पत्रकार परिषद व त्यानंतर सकाळी ठीक 1:00 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी 3:00 वाजता नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नांदेड जिल्ह्याचा कार्यअहवाल बैठक संपन्न होणार आहे. देगलुर-बिलोली तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी इत्यादींच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन,विधानसभा समन्वयक डाॅ.उत्तमकुमार इंगोले तालुका अध्यक्ष धम्मदिप गांवडे,सुभाष अल्लापुरकर तालुका महासचिव गजानन चितंले,सदिंप राजुरे आदींनी केले आहे.