मांडवा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती ग्राम परिवर्तन समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने ग्राम परिवर्तन समितीच्यावतीने सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड,पो. पा. दत्तराव पुलाते, ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, शालिनीताई धाड, कमल राठोड,कविता आडे,संगिता गजभार, जयश्री आबाळे, आरती पुलाते, यांचा पुष्पगुच्छ ,शाल, ग्रामगीता हा ग्रंथ, तंटामुक्त गावाची गीता वं. राष्ट्रसंतांची ग्रामगीता हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्मशानभूमी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सचिव मंगेश देशमुख, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, धर्मा राठोड, श्रीराम आडे, उमेद आय.सी.आर.पी. दैवशाला डोळस ,जयश्री मंदाडे, बँक सखी निकिता घुक्से, पशुसखी पुनम साखरे, दुर्गा ग्रामसंघ सचिव कविता धाड ,लेखापाल प्रतीक्षा धाड ,रमेश ढोले ,कैलास राठोड , श्रीराम पुलाते ,दिलीप आडे, विठ्ठल आडे, बाळू धाड,किरण ढोले, ग्रा.पं.कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव,देविदास गजभार, आदिनाथ पुलाते, गजानन आबाळे,बाळु पुलाते,महादेव माटे,ईत्यादी गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्राम परिवर्तन समिती कार्याध्यक्ष ओमप्रसाद घुक्से तर आभार ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष योगेश पुलाते यांनी मानले.