हिमायतनगर / एस.के.चांद
तालुक्यातील मौजे दिघी येथील एका गरीब कुटुंबातील सदस्य राजुभाऊ गायकवाड यांना लहानपणा पासूनच समाज सेवेची तळमळ होती .त्यांनी वयाच्या 24 वर्षी एका सामाजिक संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे व त्यांनी आजवर समाजातील अनेक लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आजवर सामान्य माणसाला व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम पत्रकारीतेच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ चे सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोषराव आंबेकर, उपसरपंच आनंदराव पेंटेवाड, यांच्या हस्ते राजुभाऊ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी, गजानन कुंजरवाड पाणी पुरवठा, युवा साजिक कार्यकर्ते अंकुश आंबेकर, विठ्ठल खंदारे माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ता तालुका उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रदिप तपासकर, विशाल गाडेकर, उपस्थित होते