आरोग्य

दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर

दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर

प्रतिनिधी/ नांदेड

ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले असल्याने दिव्यांग, निराधार व नोंदणीकृत बांधकाम कामगार व नोंदणीकृत रिक्षा चालक कोरोणा काळात हवालदिल झाल्याने व तसेच कोरोणा संकट काळात त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याने दिव्यांगसह ईतर कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. व तसेच दिव्यांग, निराधार व कामगारांना तात्काळ अर्थिक मदत करण्याची घोषणा लाॅक डाऊन पुर्वी ठाकरे सरकारने केली आहे. त्या अंतर्गत दिव्यांग, निराधार, वयोवृद्धाला प्रत्येकी व्यक्तीला एक हजार रुपये तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व नोंदणीकृत रिक्षा चालकांना दिड हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली.
पण ते अर्थिक मदत लवकरात लवकर त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी. जेणेकरुन लाॅक डाऊन संकट काळात दिव्यांग व कामगारांना या अर्थिक मदतीची लाभ मिळण्यासाठी शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी. जेणे करुन दिव्यांग व्यक्तीला व कामगारांना काही प्रमाणात का होईना कोरोणा संकट काळात जिवण जगण्यात थोडी फार प्रमाणात का होईना त्यांना अर्थिक मदत होईल. असे मत भ्रष्टाचार निर्मुलन अभियान चे प्रदेश अध्यक्ष सय्यद साबेर यांनी दिव्यांग व कामगार लोकांना केले आहवन

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *