उमरखेड(ता प्र):-तालुक्यातील नागरिकांना त्यांचे स्वतःचे हक्काचे अन्न धान्य मिळत नाही अश्या अनेक नागरिकांना त्यांचे अधिकराचे राशन मिळणे करिता आज सत्यनिर्मिति महिला मंडल तर्फे शासनास निवेदन देण्यात आले लॉकडाउन मुळे गोर गरीब जनता खुप अडचणीत आली असून शासनाने त्याना दोन महिन्याचे अन्न मोफत देण्याचे निर्णय घेतले पन अद्याप त्याना त्यांचे हक्काचे राशन मिळाले नाही नागरिकांना आर सी करुण आना अश्या बोलून त्यांना तहसील कार्यालय चे चकरा मारावे लागत आहे तसेच अन्न सुरक्षा लाभ ज्याना मिळाले पाहिजे त्यांना लाभ मिळत नाही व आर सी साठी महीने वर्ष उलटून ही आर सी नम्बर मिळत नाही अश्या अनेक तक्रार महिला कडून सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा सौ शबाना खान यांना माहित होत होत्या म्हणून प्रशासनास जाग यावी व गरजूवंत नागरिकांना त्यांचे अधिकार मिळावे या करिता आज रोजी तहसील कार्यालय वर शेकडो महिला समवेत सर्व प्रकारचे नियम पालून तालुका दंडधिकारी तहसीलदार यांना अन्न द्या निवेदन देण्यात आले सदर निवेदन सत्यनिर्मिति महिला मंडल टीम ने दिले व तहसीलदार यांना जनतेला होणारे त्रास व कर्मचारी व अधिकारी यांची सुरु असलेली मनमानी व गैर जबाबदार कर्तव्य बद्दल सविस्तर चर्चा केली व तहसीलदार यांनी सर्व कूपन धारकांचे सर्व समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले सौ शबाना खान यानी महिलांना कार्यालय सम्बंधित कार्य साठी महिला कारकुन ची नियुक्ति करावी व त्यांची समस्या तातडीने दूर व्हावी या साठी विनंती केली व अन्न सुरक्षा लाभ गरजू महिलांना द्यावे याची विनंती केली जर नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले नाही तर सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड आंदोलन करेल असा इशारा सुद्धा दिला निवेदन देते वेळेस सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा सौ शबाना खान सचिवा सौ सविता भागवत सह सचिवा रेहाना दादू,रजिया बी,नसीम बानो, सौ राखी मगरे, सौ सिमा खडारे, नसरीन बी,तब्बू सय्यद,शहनाज़ परवीन व महिला नागरिक तसेच तहसील स्टाफ उपस्थित होते.
