हिमायतनगर/ प्रतिनिधी नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या दोन हजार वीस एकवीस च्या यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या झालेल्या गोंधळाबद्दल येथील लाभार्थ्यांनी थेट प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन समितीचे मीडिया प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड नागोराव शिंदे यांच्या कडे संपर्क साधला असताना नागोराव शिंदे यांनी लाभार्थ्यास सह गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायत्नगर यांना पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांच्या पात्र यादी मध्ये झालेल्या गोंधळाची पूर्ण माहिती देऊन सखोल चौकशी करणे बाबत पत्र देताच गटविकास अधिकारी सुधीष मांजरमकर यांनी नागोराव शिंदे यांच्या सह गलेल्या लाभार्थ्यांना आश्वासन दिले की राज्यशासनाने आदेशित करताच ड च्या यादीमधून वगळण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची मी जाई मोक्यावर जाऊन चौकशी करून त्यांना घरकुल योजनेच्या यादी मध्ये समाविष्ट करण्यात येईल अशी गवाई देताच गेलेल्या पात्र लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी माजरमंंकर यांचे समाधान मानले आहे यावेळी लाभार्थी सदाशिव वानखेडे विश्वनाथ देवसरकर तुकाराम वानखेडे हनुमान वानखेडे राजू कदम दिगंबर माने तातेराव वानखेडे यांच्यासह पळसपुर येथील शेकडो लाभार्थी उपस्थित होते