प्रतिनिधि (वहीद खान) नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्याना चांदुर बिस्वा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की आज शनिवार ५ जून रोजी चांदुर बिस्वा पोलीस चौकीचे एएसआय मनोहर बोरसे यांना अवैद्य दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल संदीप ढोले व पोलिस कॉन्स्टेबल सुनील सुशिर यांच्यासह सापळा रचून दुपारी एक वाजता मोमिनाबाद येथे देशी दारू घेऊन आलेल्या आरोपी अक्षय प्रभाकर चंदनकर वय 23 वर्षे रा. नरवेल यांच्याकडून देशी दारू संत्रा 96 कॉटर कि, ६ हजार ७२० रुपये टॅंगो पंच ८० बॉटल किं. २८०० रुपये एक पोतळी किंमत २० रुपये टीव्हीएस ज्युपिटर गाडी किंमत 40 हजार रुपये असा एकूण 49 हजार 540 रुपयाचा माल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपी असून अक्षय प्रभाकर चंदनकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून टीव्हीएस ज्युपिटर गाडीचा मालक विशाल उर्फ रीकी ओम प्रकाश जयस्वाल रा. मलकापूर रवी अग्रवाल रा. मलकापूर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. वरील तीनही आरोपी विरुद्ध कलम 65(अ)(ई) मुंबई दारूबंदी कायदा 109 भादवी 158/177, 105( 2)/177 मावोका नुसार गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास एएसआय मनोहर बोरसे करीत आहे.