हिमायतनगर प्रतिनिधी .
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यांची कामे धुमधडाक्यात चालू आहेत कोरोणा संसर्गजन्य माहामारी असल्याने चालू असलेल्या कामावर अधिकारी हे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित असल्याने गुत्तेदार हे घाईगडबडीने रस्त्याच्ये काम उरकून बील काढण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे
असाच एक प्रकार हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी ते पैनगंगा नदी इ. जी. १४ विदर्भ मराठवाडा जोडणारा जिल्हा सिमा रस्ता गांजेगाव पुलाकडे जाणार्या रस्त्याचे काम चालू करून तिनते चार दिवसात गुत्तेदार उरकत असल्याचे ग्रामस्थांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले आहे
या बाबतीत
घाईघाईने काम उरकून घेत असल्याचे डोल्हारी येथील नागरिकांनी उप विभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हदगाव यांचे कडे फोनवरून तक्रार केली आहे सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असुन चार दिवसांत काम ऊरकिले
या कामात डांबर कमी वापरुन ईस्टीमेंट प्रमाणे काम होत नसल्याचे येथिल सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे
लाॅकडाऊन असल्याने या कामाकडे शासकीय अधिकारी फीरुन पहात नसल्याने गुत्तेदार घाईगडबडीने चार-पाच दिवसांत काम उरकून घेऊन बिल काढण्यासाठी धावपळ करित असल्याचे येथील नागरिकांनी फोनवरून तक्रार करत या कामाचा पाढाच वाचण्यात आला आहे
तरी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या कामाकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देउन जायमोक्यावर येऊन कामाचि पाहणि करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांतुन जोर धरत आहे