हिमायतनगर शहरात वाळू तस्करी जोरात
वाळू तस्कऱ्यांना अभय
हिमायतनगर प्रतिनिधी :- एस.के.चांद
हिमायतनगर शहरात वाळू तस्करी जोरात सुरु असून,तहसील प्रशासन मात्र झोपेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हिमायतनगर शहरात बाजार चौक सिरंजनी रस्त्याने रात्र दिवस 24 तास वाळू तस्करी चालू असून,
वाळू तस्करांची दादागिरी हि वाढली असल्याचे दिसत आहे,
कारण सिरंजनी रोड ते बाजार चौक परिसरातून जात असताना वाळू तस्कर हे आपले ट्रेकटर जोरात धावत नेत असून, लोकांच्या लेकरे बाळानां रस्त्यावर ये जा करिता त्रास होत असून, लहान लेकरे मुलांनाचा जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
एकूण 24 तास रात्री बे रात्री ट्रॅक्टर ने वाळू नेत असल्यामुळे वो ट्रेकटर जोरात धावत नेत असल्याने लोकांची झोप उडाली आहे,,
टेक्टर दमाने चालवा असे सांगितल्यास दादागिरी करीत असल्याने बाजार चौक कालिका गल्ली परिसरातील लोकनां संताप आला आहे,
पण तहसील प्रशासनाचे अभय असल्यानेच हे दिवस रात्र 24 तास वाळू तस्करी करीत आहे,,,
असे समजते
वाळू तस्करी करण्याचा बाजार चौक मोहन सिंह ठाकूर यांचे घरा समोरून ते सिरंजनी रस्त्यास चोर रस्ता असा म्हणावा लागेल,,,