महावितरणचे जुनाट खाली लोंबलेल्या विद्युत वाहीनीच्या तारेकडे दुर्लक्ष
ब्योरो रिपोट -:- हिमायतनगर,नांदेड
हिमायतनगर तालुक्यात नेहमीच महावितरणचा मनमानी कारभार चालु असतो , महावितरणचे अधिकारी यांचे तालुक्यातील विद्युत पुरवठा असो किंवा जुनाट विद्युत वाहिनीच्या खाली लोंबलेल्या तारा असो या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करतात.
तालुक्यात अंदाजे 1965 सालि बसवले दर्या जुनाट विद्युत वाहीनीच्या तारा १५ ते २० दिवसाच्या अंतराने अनेक ठिकाणी तुटुन पडल्याच्या घटना घडत आहेत याविषयी कित्येकदा महावितरणकडे नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत पण महावितरणच्या अधिकाऱ्याना याचे गांभीर्य राहीलेले नाही. अशीच एक नुकतीच घटना हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर गावात दिनांक 29 रोजि सकाळी आठच्या सुमारास नागनाथ मंदिरासमोर घडली आहे,
सविस्तर वृत असे कि पळसपुर गावामध्ये सगळीकडे विद्युत वाहीनीच्या तारा कित्येक वर्षापासुन बदलेल्या नाहीत, त्यामुळे या तारा खुप जुनाट असुन ठिकठिकाणी त्या तारांना जोड देण्यात आल्याने खाली लोंबलेल्या आहेत तसेच या खाली लोबलेल्या तारांना ठिकठिकाणी लाकडाच्या पट्टया बांधण्यात आलेल्या आहेत कारण या तारांचा एकमेकांना स्पर्श होणार नाही व कोणाला यापासुन धोका निर्माण होणार नाही असा गैरसमज महावितरणच्या अधिकाऱ्याना झाला आहे
पळसपुर येथिल विद्युत वाहीनीच्या तारा ह्या रस्त्याच्या मध्यभागी असल्याने त्यापासुन लहान मुलमुलीं, जनावरे व गावातील नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, कारण या जुनाट विद्युत वाहिनीच्या तारांना ठिकठिकाणी जोड देण्यात आल्याने या तारा खाली लोंबल्याने त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन त्या तुटुन रस्त्यावर पडत आहेत, आज नागनाथ मंदीरासमोरील मैदानात लहान बालके खेळत असताना विद्युत वाहीनीची तार तुटुन रस्त्यावर पडली त्या ठिकाणी पत्रकार नागोराव शिंदे यांनी तत्परतेने पळसपुर 33 के व्हि उपकेंद्र यांना फोन करून विद्युतपुरवठा बंद करण्यास सांगितल्याने दुर्दैवाने यात लहान लेकरांचे व गावातील नागरीकांचे प्राण थोडक्यात वाचले. विद्युत वाहीनीची तार तुटण्याची ही या दोन महीन्यातील चौथी घटना आहे तरी महावितरणला याविषयी अजुनतरी गांभीर्य असल्याचे जाणवत नाही.
महावितरण दर महीन्याला विद्युत पुरवठ्याचे बिल वसुली करण्यासाठी वेळेवर येतात जर बिल भरण्यासाठी थोडा विलंब झाला तर विद्युत पुरवठा खंडीत करतात, शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नाही त्यांनाही महावितरण सतत त्रास देताना आढळुन येत आहेत पण तालुक्यातील जुनाट विद्युत वाहीनीच्या तारांमुळे नागरीकांच्या प्राणाला धोका निर्माण झाला आहे याची त्यांना थोडीही चिंता नाही व आपला मनमानी कारभार चालुच आहे. पळसपुर गावातील व हिमायतनगर तालुक्यातील या जुनाट विद्युत वाहीनीच्या तारांनी नागरीकांचा बळी घेतल्यावर बदलणार का ? अशी चर्चा गावातील व तालुक्यातील समस्त नागरीक महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. याबाबत प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार व प्रसार मीडिया प्रभारी नांदेड जिल्हा अध्यक्ष नागोराव शिंदे यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आठ दिवसात जुनाट झालेल्या विद्युत तारा महावितरण कंपनीने नाही बदलल्या तर अधीक्षक अभियंता नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे