पैनगंगा नदीचे पात्र कोरडे.
ईसापुर धरणाचे पिण्यासाठी पाणी सोडा माजी उपसरपंच राजू पाटील शेल्लोडेकर
ब्योरो रिपोट :- हिमायतनगर.
तालुक्यातुन वहानारी पैनगंगा नदी एक महिन्यापासून कोरडी पडली असल्याने विरसनी दिघी घारापुर रेणापूर पळसपुर डोल्हारी शेलोडा सीरपली ईत्यादी गावातील नदी पात्र कोरडे पडले असल्याने पीण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राणी जीव जनावरांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे
मार्च महिन्याच्या प्रारंभापासून कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली असून नैसर्गिक पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे. व तसेच या भागातील जिवन वाहीणी असणारी पैनगंगा ही आता पुर्णत्वाने एक महिन्यापासून कोरडी पडली आहे. परिणामी या भागातील जनतेला पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. वन्य प्राणी व पाळीव प्राण्याचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचा बनला आहे. अश्या गंभीर परिस्थितीत इसापूर प्रकल्पांतून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येवून सजिवसृष्टीला दिलासा द्यावा. अशी मागणी मा. सरपंच राजू पाटील भोयर शेल्लोडेकर यांनी केली आहे.
कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्य़ात सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. शहरातील नागरिकांना बाहेर पडण्याची मनाई असल्याने सर्व प्रतिष्ठान बंदच आहेत. परंतू जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा प्रखर ऊन्हात आपल्या शेतात राबत आहे. येत्या खरिपाच्या पेरणीची पुर्व तयारी चालू आहे. आता रानावनात पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रकर्षाने जाणवत आहे. हिमायतनगर तालुक्यासह शेजारील उमरखेड तालुक्यातील गांवाच्या बहुतांश सार्वजनिक नळ योजना ह्या पैनगंगेवरूनच आहेत.
सध्या नदी पात्र कोरडे ठाक पडल्याने या भागात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. व मुक्या जनावरांचाही पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. ही अती निकड लक्षात घेऊन इसापूर प्रकल्प प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी ही राजू पाटील भोयर शेल्लोडेकर यांनी केली आहे.