शेतकऱ्यांचा कृषीपंपाचे व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवा.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदने.
हिमायतनगर नांदेड दि.23 मार्च
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कृषी पंपाच्या व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवण्यासाठी आज महाराष्ट्रातील तालुका, शहर व जिल्हा,राज्य कार्यकारणीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी स्थानिक कार्यालयात जाऊन स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना
शेतीपंपाची सक्तीची विजबील वसूली व वीज तोडणी त्वरित थांबवण्याबाबत व थकीत वीज बिलासंदर्भात ग्राहकांना हप्ते पाडून देऊन दिलासा द्यावा या संदर्भात राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
करोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून राज्यातील नागरिक शेतकरी हवालदिल असतानाच वीज वितरण कंपनीने अवाच्या सव्वा बिले दिली आहेत. या सर्वांच्या विरोधात व स्थानिक आपल्या भागातील परिस्थितीनुसार मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारणीच्या पदाधिकारी निवेदन दिले असून तात्काळ वीज तोडणी थांबवुन थकित वीज बिलाचा संदर्भात हप्ते पाडून वीजग्राहकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राज्यभरातील पदाधिकार्यांच्या वतीने देण्यात आले. नांदेड अधीक्षक अभियंता श्री वहाने यांना प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर, श्रीहरी सकनोरे तेजस फाळके तर हदगाव येथे तालुकाध्यक्ष विलास माने तालुका कार्याध्यक्ष अविनाश कदम नागेश कदम यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार राऊत वाशिम येथे अमरावती विभाग अध्यक्ष रूपालीताई देशमुख शंकरराव देशमुख बिलोली येथे तालुकाध्यक्ष नामदेव नरवाडे पाटील यांनी निवेदन दिले.
या निवेदनाची महावितरण कंपनीने दखल न घेतल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने देण्यात आले.