अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह
पुसद/प्रतिनिधी
वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आसेगावकर पेट्रोल पंपा जवळ एका कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
हा मृतदेह दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्यामुळे दुर्गंध येत असल्यामुळे नागरिकांना ही माहिती मिळाली.
त्यानंतर वसंत नगर पोलीस स्टेशन ला माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले परंतु अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही.