तालुका प्रतिनिधी/पुसद -:-
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुसद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी युवा नेतृत्व स्वप्नील शंकराव माहुरे यांची निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत देशातील आर्थिक बदलांमुळे प्रत्येक समाजाला विकासाची फळे चाखायला मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर विकास प्रत्यक्षात त्यांच्या दृष्टिपथात आला. मात्र, आदिवासी समाज आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासावर हजारो कोटी रुपयाने खर्च केला जातो. मात्र, गरिबी, शिक्षणाचा अभाव, कुपोषण आणि आरोग्याची परवड आदी समस्यांसह विकासाच्या वाटेवरून हा समाज आजही कोसो दूर आहे.
त्यामुळे त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद,नवी दिल्ली कार्यरत आहे.
पुसद तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी समाजातील बहुतांश कुटुंब डोंगर दऱ्यात वाड्या वस्त्यात राहत असल्यामुळे हे तळागाळातील आदिवासी समाजाचे लोक वर्षानुवर्षे शासकीय योजने पासून कोसो दूर राहातात त्यामुळे त्यांना शासकीय योजनेच्या व समाजातील मुख्य प्रवाहात आणण्या करीता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ,नवी दिल्ली ,शाखा यवतमाळ यांचे मार्फत आदीवासींचे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी तसेच समाजसेवेच्या कार्यासाठी व अखिल भारतीय आदीवासी विकास परिषदेचे सामाजिक संघटनात्मक कार्य शहरी /ग्रामीण भागात वृध्दींगत करण्यासाठी स्वप्नील शंकरराव माहुरे यांना पुसद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. अखिल भारतीय आदीवासी विकास परिषदेचे यवतमाळ जिल्हाअध्यक्ष नरेशभाऊ गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशभाऊ सिडाम, पुसद शहर अध्यक्ष सचिन अत्राम, यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नील शंकरराव माहुरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे स्वप्निल माहुरे यांच्या नियुक्तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.