ब्योरो रिपोट :- पुसद यवतमाळ
धम्मभुषण ॲड .आप्पाराव मैंद
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध व उपचार मोहिमेत (३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी १९९९) विशेष कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयातर्फे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला .तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मि. पिटर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट घेऊन कुष्ठरोग दुरीकरण मोहिमेत विशेष कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला. तसेच माझ्या जीवनात मला आतापर्यंत अनेक प्रशस्तीपत्र व मला अनेक पुरस्कार मिळाले परंतु अमरावतीच्या महाबोधी संस्थेच्यावतीने 3 फेब्रुवारी रोजी नेर वटफळी येथे संपन्न झालेल्या धम्मपरिषदेत धम्मप्रिय महाथेरो (कपिलवस्तु) व भदन्त प्रा. सुमेधबोधी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मला धम्मभुषण पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी आतापर्यंतच्या पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे असे मत धम्मभूषण ॲड. आप्पाराव मैंद यांनी सत्कार सोहळ्याच्या सत्कारमूर्ती म्हणून आपले मत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्यावतीने चार्वाक वन श्रावस्ती बुद्ध विहार येथे घेतलेल्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे हे होते. सत्कारमूर्ती म्हणून धम्मभूषण ॲड.आप्पाराव मैंद हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे, बौद्धाचार्य प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे, के.व्ही.मुनेश्वर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पुष्प वाहून व पूजन करून आणि सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी जि. प .सदस्य भोलानाथ कांबळे, भगवान बरडे, मनोज नाईक, भगवान खंदारे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले .या कार्यक्रमास बी. जी. राठोड , टी.बी.कांनिदे, माजी सैनिक नितीन धुळे, सचिन धूळध्वज ,लक्ष्मणराव पाटील , माजी सैनिक धम्मपाल पडघणे, एन.डी.ताटेवार, गोवर्धन मोहिते, सुभाष दायमा,वामनराव देशमुख, राहुल पडघणे,विश्वजीत भगत, बाळासाहेब ढोले हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर बन्सोड यांनी केले .तर आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले.
प्रतिनिधी :- मो.मुब्बसिर