राजकारण

पदवीधरांच्या न्याय हक्काचे कायदे करण्यासाठी बोराळकर यांना विधानपरिषदेवर पाठवा :आमदार रातोळीकर….

 

हिमायतनगर(प्रतिनिधी) मागील बारा वर्षापासून मराठवाड्यातील पदवीधरांच्या समस्या सातत्याने रेंगाळत आहेत त्यांच्या प्रश्नाकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही किंबहुना त्यांचे संबंधित प्रश्न विधानपरिषदे मध्ये कोणीही आजपर्यंत मांडले नाहीत त्यातच आता तीन तोंडाची सरकार आपल्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांनाच सुटता सोडवता येत नाही नसल्याने पदवीधरांच्या समस्येकडे ते कुठून लक्ष देणार अशी विरोधकांवर टीका करत मराठवाड्यातील पदवीधरांच्या न्याय हक्काचे कायदे करण्यासाठी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना माझ्यासोबत विधानपरिषदेवर पाठवा आम्ही दोघे पण मराठवाड्यातील पदवीधरां च्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू व निवडून आल्या वर त्यांना हिमायतनगर ला घेऊन येऊ असे आव्हान आमदार राम पाटील रातोळीकर यांनी हिमायतनगर येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात व सरसम येथील श्रीधर देशमुख विद्यालय आयोजित केलेल्या समविचारी सभेत बोलताना सांगितले

भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 28 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुद्धा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिरीश बोराळकर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी हिमायतनगर येथे धावती भेट दिली व येथील सर्व पदवीधरांना आव्हान केले की जास्तीत जास्त मतदारांनी एक तारखेला शिरीष बोराळकर यांना एक नंबर च्या पसंतीचे मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आव्हान देखील केले व येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष आशिष सकवान यांनी स्वतः सर्व भाजप कार्यकर्त्याला घेऊन हिमायतनगर शहरात ग्रामीण भागात 820 पदवीधरांच्या गाठीभेटी घेऊन तालुक्यातील सरसम ,जवळगाव . हिमायतनगर .बूथ स्तरावर जाऊन होम टू होम कशे मतदान करायचे से सांगत तालुक्यात प्रचारामध्ये आघाडी मिळवली आहे

यावेळी त्यांच्या सोबत भाजपा हदगाव चे शेखर कदम अरुण सुकळकर मा.रावसाहेब देशमुख.मा चिटणीस सुधाकर पाटील .किशनराव पाटील .खंडु चव्हाण. चंद्रकांत पवार गजानन भाऊ तुप्तेवार ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, राम जाधव ,सुभाष माने,
विनोद दुर्गेकर ,सोनारीकर.वामनराव पाटील मीराशे, परमेश्वर सूर्यवंशी, भाजपा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हिदायत खान, सि एन कदम.ज्ञानेश्वर पंदीलवार, दत्ता शिराने, विकास कळकेकर मधुकर पांचाळ ज्ञानेश्वर शेवाळे बालाजी ढोणे सह आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *