ताज्या घडामोडी

ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी.

ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी.

ढाणकी प्रतिनिधी //
मागील अकरा महिन्यापासून बंद असलेल्या ढाणकी येथील आधार नोंदणी तात्काळ सुरु करण्यासाठी ढाणकी युवा सेना, शिवसेना तर्फे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे.
आधार हे शासकीय कामासाठी लागणारे महत्वाचे दस्तऐवज असून लहानां पासून वृद्ध पर्यंत सगळयांना शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक आहे. ढाणकी या शहराला 30 ते 40 खेडे जोडले असून त्यांना ढाणकी येथे 50किमी चे अंतर पार करून यावे लागत आहे. मात्र ढाणकी येतेही मागील अकरा महिन्यापासून आधार सेवा बंद असल्याने नागरिकांना उमरखेड किंवा विडुल ला जावे लागतं आहे. त्यात त्यांना मोठा आर्थिक बोजा बसत आहे. सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी सुद्धा आधार आवश्यक असून शेतकऱ्यांची सुद्धा मोठी परेशानी होत आहे. तेव्हा शेतकऱ्यांची व नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन ढाणकी शहर युवासेना व शिवसेना मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ जाधव, डॉ अमोल आरमालकर, दत्ता भाऊ सुरोशे, शिवाजी फाळके, रमेश होले, शेख एजाज, युवासेना शहर प्रमुख संभाजी गोरटकर, उप तालुका प्रमुख विशाल नरवाडे, दिलीप नंदनवार, इत्यादी शिवसैनिक हजर होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *