विदर्भ मराठवाडा दुसऱ्यांदा संपर्क तुटला गांजेगाव पुल,
प्रतिनिधी /शेख इरफान
इसापूर धरणातील काल दिनांक 17 तारखेला 11 वक्र द्वारा द्वारे विसर्ग सुरू,
मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी सोडल्यामुळे कयाधू लाखाडी नदी व पैनगंगा नदी या संगमावरील अनेक गावांना पुरांचा मोठा फटका बसला असून नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे पिके पावसामुळे,महापुराच्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीक नष्ट झाले आहे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
उमरखेड आणि हादगाव, हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पुर आल्याने दुसर्यांदा मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला. १९आॅगष्ट रोजी एक महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे गांजेगाव येथील पुलावर पाणी आल्याने वहातुक बंद झाली होती.
इसापूर धरण १०० टक्के भरल्याने पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व काल रात्री झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे गांजेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने जनजिवन विस्कळित झाले.
मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवरुन वहाणार्या पैन गंगा नदीचे पाणलोट क्षेत्रात आठवभरच्या पडणार्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने पेन गंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने गांजेगाव पुलावरुन पाणी वहात असल्याने या पुरात वाहून आलेली एक म्हैस पुलाला अडकली आहे. हिमायतनगर- पळसपुर गांजेगाव, ढाणकी मार्गाची वहातुक बंद झाल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला आहे.
मागील अनेक दिवसापासून हदगाव तालुक्यातील तामसा, पाथरड,वाळकी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत. काल रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे कयाधू लाखाडी नदीला पूर येऊन उमरखेड आणि हादगाव तालुक्यातील पाथरड ,कंजारा, शिवनी, कोपरा वाळकी धानोरा बोरगाव टाकळा, लिंगापूर, रावणगाव,धोत्रा,कामारी या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,प्रचंड मोठा पाऊस पडल्यामुळे पुराच्या पाण्याने रौद्र रूप धारण केला आहे, त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सुटल्यामुळे दोन्ही नदीच्या संगमावर पाण्याचा तुंबावा मोठा होत आहे,त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व नुकसान ग्रस्त पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे वाहून गेल्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे, जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे सुरू करावे.