क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नागोराव शिंदे

 

नांदेड हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पत्रकार नागोराव शिंदे यांनी पोलिस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली तालूक्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे दहशत वाळु तस्करी गावठी कट्टे या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे पोलीस आधळ्याची भुमिका घेत असल्याचे या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहे गल्ली बोळात सुरू असलेल्या जूगाराचे आडे हाँटेलमध्ये व धाब्यावर बनावट दारू मिळतं असल्यामुळे तरूण पिढी व्यसणाच्या आहारी जात आहे त्यामुळे वाढलेल्या अवैध धंदे यामुळे शहरात व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे या सर्व प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे शहरात वाढती गुन्हे गारी आणि गून्हाना आळा घालण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात असे असले तरी शहरात व ग्रामीणमध्ये रात्रीच्यावेळी घडणार्या गुन्ह्याचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही.त्यामुळे तालुक्यात गुन्हे गारीचे मोठें जाळे पसरतं आहे लुटमार मारामारी चोर्या या घटनेमुळे अधिक बेजार झालेल्या नागरिकांना आता खून व दरोडा याची धास्ती वाटु लागली आहे त्यामुळे तालुक्यातील वातावरण दुषित होतांना दिसत आहे व राजकीय वैमनस्यातून आणि आर्थिक लाभापोटी गुन्हेचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे बोले जात आहे जर का तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद केलें तर गून्हे गारी कमी होण्यास मदत होईल या सर्व गोष्टीचा विचार पोलीस प्रशासन यांनी लवकर घेऊन अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी नागोराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *