आरोग्य

बिटरगांव बु येथिल शासकीय आयुर्वेदीक दवाखान्यातील डाॅक्टर गैरहजर.

 

बिटरगाव प्रतिनीधी // राजू पिटलेवाड

उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिटरगांव बु येथील शासकीय आयुर्वेदीक दवाखान्यातील डाॅक्टर सतत गैरहजर राहत असल्या मुळे आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोव-यात सापडत असल्याचे चित्र सध्या बिटरगांव मध्ये पहावयास मिळत आहे.

वरिष्ट  अधिका-यांना येथील नागरीकांनी फोनवरून वारंवार तक्रारी करून सुध्दा येथिल डाॅक्टर गैरहजर राहुन आँफीसचे कामे सांगतात व सर्व येथील शेतकरी, मजुर, शेतात गेल्यानंतर डाॅक्टर कधी तरी येउन 30 मिनीट थांबुन चार पाच रूग्नांची नोंद घेवुन निघुन जातो . त्यातही या दवाखान्यात औषधे उपलब्ध नसल्याने खाजगी मेडीकल वरून किंवा खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे .यामुळे सध्या कोरोणा व्हायरस चा उद्रेक दिवसागणिक वाढत असुन येथील रूग्नांना कोरोना व्हायरस चे रूग्ण ढाणकी बाजार पेठ येथे प्रमाणात वाढत असुन यामुळे बिटरगाव येथे कोरोना चा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. वेळेवर उपचार झाला नाही तर
उमरखेड तालुक्याच्या ठिकाणी खाजगी वाहणे करून गरीब शेतमजुरांची आर्थीक पिळवणुक करत जावे लागात आहे .तसेच येथील दवाखाना व डॉक्टरच गावातील नागरीकांच्या उपयोगी येत नसल्याने डाॅक्टरांची बदली करून दुसरा डॉक्टर  देण्याची मागणी याठिकाणी होत आहे.

सध्या सर्दी , खोकला, तापीची साथ सुरू असुन या ठिकाणी बरेच नागरीक ढाणकी शहरात कोरोणा रूग्न ढाणकी शहरात आढळुन आले आहेत. त्यामुळे बिटरगांव येथिल नागरीक सुध्दा भितीच्या वातावरणात असुन डाॅक्टरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.डाॅक्टरांना उपकेंद्रात राहणे अनिवार्य असुन रात्रीच्या वेळी येणा-या डाॅक्टरांच्या गैरहजरीमुळे उपचारा विना परतावे लागत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *