हिमायतनगर प्रतिनिधी//
तालुक्यातील सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व तसेच मागील काळात संत्तधार पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन मुग उडीद या पिकांवर बुरशी चा प्राधुरभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी माजी आ,नागेश पाटील आष्टीकर ,युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटी ल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना युवासेेने तर्फे निवेदन देण्यात आले
तालुक्यातील शेतकरी करपा रोग पिकावर आल्यामुळे हैराण झाला आहे आधीच कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱ्यावर हे आता नवीन संकट उभे टाकले आहे काढणीला आलेले पीक या पावसामुळे हातातून गेलेली आहेत या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावा अशी मागणी हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवर,विलास वानखेडे, संजय सुर्यवंशी, अमोल धुमाळ,रामू नरवाडे,दिलीप कात्रे,अरविंद पाटील सह शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे