ताज्या घडामोडी

विपुल दंडेवाड यांची हिमायतनगर सिरंजनी शिलोडा रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

 

हिमायतनगर प्रतिनिधी /

युवा कार्यकर्ते विपुल दंडेवाड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार तालुक्यातील सिरंजनी ते शिल्लोडाफाटा पर्यंत होत असलेले डांबरीकरणाचे काम अंदाजपत्रकाला बगल देत अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे युवानेते विकास प्रेमी नागरिक विपुल दंडेवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे केली आहे

सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे दि 19 ऑगस्ट 2020 रोजी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की हिमायतनगर सिरंजनी ते शेल्लोडा मार्गावर सुरू असलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून सदरील रस्ता करत असताना सबंधित गुत्तेदाराने अंदाजपत्रका प्रमाणे जुन्या रस्त्याचे खोदकाम करून नवीन रस्ता करणे अपेक्षित होते परंतु कंत्राटदाराने सदरील रस्त्याचे खोदकाम न करता डांबरी रस्त्यावर वापरण्यात येणारा दगड विहिरीचा आहे त्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने करू रस्त्यावरील खड्डे बुजवून थातुर मातुर पद्धतीचे काम करून शासनाच्या डोळ्यात धुळ फेक करून बिले लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तक्रारदारा समक्ष या रोड च खातेनिहाय चौकशी होईपर्यंत हे काम थांबवावे तोपर्यंत या साऱ्याचे देयके काढू नये अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून याच रस्त्यावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्या निवेदनात दिला आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *